आर्थिक सेवा आणि सुविधा

आपल्या सहकार्यातून निर्माण झालेले विश्वासाचे प्रतिक - कुणबी पतपेढी राजापूर

कोअर बँकिंग सेवा (CBS)

संस्थेच्या प्रधान कार्यालयासह सर्व शाखा संगणकीकृत असून CBS प्रणालीद्वारे सर्व शाखेतून तत्पर सेवा पुरविली जाते.

ठेव योजना

संस्थेमध्ये बचत, चालू, मुदत, दामदुप्पट आणि आवर्ती (RD) अशा विविध आकर्षक ठेव योजना उपलब्ध आहेत.

कर्ज सुविधा

सभासदांच्या प्रगतीसाठी आणि विविध गरजांसाठी अल्प व मध्यम मुदतीची कर्ज सुविधा पुरविली जाते.

डिजिटल पेमेंट

सुरक्षित आणि जलद निधी हस्तांतरणासाठी RTGS, NEFT आणि IMPS या सेवा उपलब्ध आहेत.

मिनी एटीएम सुविधा

संस्थेच्या सर्व शाखांमधून मिनी एटीएमद्वारे कोणत्याही बँकेतील रक्कम काढण्याची आधुनिक सुविधा उपलब्ध आहे.

SMS अलर्ट आणि मोबाईल बँकिंग

खातेदारांना व्यवहारांची त्वरित माहिती मिळण्यासाठी SMS अलर्ट सेवा आणि लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा सुरू होत आहे.

आजच आमच्याशी जोडून घ्या!

आपल्या सहकार्यातून निर्माण झालेले विश्वासाचे प्रतिक - कुणबी पतपेढी राजापूर. सुरक्षित भविष्यासाठी आणि उत्कृष्ट आर्थिक सेवांसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

संपर्क साधा

आपली बचत, आमचा विश्वास!

आकर्षक व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणुकीचे विविध पर्याय जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा !आम्ही तुमच्या प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध आहोत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

तुमच्या प्रगतीचा महामंत्र!

शेती, उद्योग किंवा वैयक्तिक गरजांसाठी सुलभ कर्ज योजनांचा लाभ घ्या. तुमच्या स्वप्नांना द्या आर्थिक बळ!

आजच चौकशी करा

लोकहितकारी योजना

समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक उन्नतीसाठी आमच्या विशेष ठेव आणि कर्ज योजना.

दीपोत्सव ठेव योजना

सर्वसामान्यांसाठी ८.७५% आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ९.२५% असा उच्च व्याजदर दिला जातो. या योजनेची मुदत १६ महिने आहे.

वाहन तारण कर्ज

नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आकर्षक दराने कर्ज सुविधा उपलब्ध आहे. ७ वर्षांपर्यंतच्या सुलभ मुदतीसाठी हे कर्ज दिले जाते

विशेष ठेव योजना

१८० दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठी ही योजना असून यात ७.७५% व्याजदर दिला जातो. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ८% व्याजदर उपलब्ध आहे.

पिग्मी ठेव योजना

दररोज बचत करणाऱ्या व्यावसायिक वर्गासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. संस्थेचे प्रतिनिधी दररोज आपल्या दारी येऊन रक्कम संकलित करतात. ही योजना ४.००% व्याजदराने उपलब्ध आहे.