वारसा आणि प्रेरणा
राजापूर तालुक्यातील थोर समाजसुधारक कै. गणपतराव (दादा) नवाळे, माजी राज्यमंत्री कै. भाईसाहेब हातणकर आणि कै. स.म. कातकर सर यांसारख्या महनीय व्यक्तींच्या दूरदृष्टीतून आपल्या संस्थेचा पाया रचला गेला. सामान्य माणसाला सावकारी पाशातून मुक्त करून सहकाराच्या माध्यमातून त्याचा विकास साधणे, हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. २० ऑक्टोबर १९९४ रोजी लावलेल्या या लहानशा रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले असून, संस्था आज आपल्या ३२ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे.
- प्रेरणास्थान: थोर समाजसुधारक कै. गणपतराव (दादा) नवाळे, कै. भाईसाहेब हातणकर आणि कै. स.म. कातकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात.